रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरातील सरदार जी.जी.हायस्कूलमध्ये (Sardar G G High School,Raver) एकाने शिक्षकेतर कर्मचार्यांना शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. [ads id="ads1"]
संशयीत ईश्वर महाजन यांनी रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूलमधील (Sardar G G High School,Raver) कार्यरत कनिष्ठ लिपिक नरेंद्र नथू माळी व योगेश भट,राजू महाजन व भास्कर गुरव यांना दिनांक 26 डिसेंबर सोमवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विद्यार्थ्याच्या स्कॉलरशीप परीक्षेच्या फॉर्म (MAHA DBT Scholorship Form) भरण्याच्या कारणावरून हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ करीत धमकी दिली. [ads id="ads2"]
यावेळी उपस्थित शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित समजावण्याच्या परिस्थितीत नसल्याने माळी यांच्या फिर्यादीवरून ईश्वर महाजन विरुद्ध रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस कर्मचारी ईस्माईल शेख हे करीत आहेत.



