यावल (सुरेश पाटील)
दि. 21 जानेवारी 2023 रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल आयोजित राष्ट्रीय सेवा योजना,हिवाळी शिबिर चितोडा येथे संपन्न होत आहे.आज "युवकांचा ध्यास व ग्राम-शहर विकास" या विषयावर डॉ.नरेंद्र दिनकर महाले यांची कार्यशाळा संपन्न झाली.याप्रसंगी डॉ.नरेंद्र महाले यांनी आपल्या कार्यशाळेत ग्राम व शहर या संदर्भात युवकांची भूमिका ही प्रकर्षाने मांडली. [ads id="ads1"]
युवक म्हणजे काय? युवक कसा असावा? युवकाने ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न करावेत ?त्यातून समाजाचा विकास कसा साधावा,या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.अनेक उदाहरणांच्या दाखला देत विद्यार्थ्यांना नवनवीन समाज विकसनाच्या योजना व उपक्रम यांची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना स्व विकास साधून समाजविकासातून ग्रामीण भागाचा व सामाजिक विकास कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन केले डॉ.महाले यांनी या कार्यक्रमात काही खेळ घेऊन त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. [ads id="ads2"]
फार अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने कार्यशाळा संपन्न झाली. ग्रामीण व शहरी विकास करायचा असेल तर कृती व संस्कृती यांच्या समन्वयातून ग्रामीण व शहरी भागाचा विकास होईल असे डॉ.नरेंद्र महाले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.डी. पवार सर,सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा.भारती सोनवणे,प्रा.सुभाष कामडी,प्रा. गणेश जाधव,ह.भ.प.संचित कोळी महाराज,यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तेजस्विनी कोलते यांच्याकडे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी माळी हिने,तर आभार दिपाली पाटील हिने मानले.
--------------------------------------
यावल महाविद्यालयास प्रसिद्धी माध्यमांचे महत्त्व नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
--------------------------------------
यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नेहमी शैक्षणिक व इतर अनेक महत्त्वाचे आणि कौतुकास्पद कार्यक्रम नियोजनबद्ध रीतीने राबविले जातात परंतु महाविद्यालयातील अनेक कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धीसाठी यावल शहरातील सर्व प्रसिद्धी माध्यमांना एका वेळेला दिली जात नसल्याने महाविद्यालयातील कौतुकास्पद आणि विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची माहिती पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्ध होत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे,त्यामुळे यावल महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाची,कार्यक्रमाची माहिती सर्व प्रसिद्धी माध्यमांना एकाच वेळेला द्यायला पाहिजे असे महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्येच बोलले जात आहे.