रावेर तालुका प्रतिनिधि (विनोद हरी कोळी) ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स. व. प कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभा आणि अर्थशास्त्र व नियोजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. [ads id="ads1"]
प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बि. अंजने यांनी भूषविले प्रमुख वक्ते प्रा सि. पि. गाढे, यांनी आपल्या व्याख्यानातून सावित्रीबाई फुलेंचा कार्याचा पूर्ण आलेख चित्रित केला प्रा. एम. के. सोनवणे यांनी शिक्षणाचे महत्व सांगून सावित्रीबाई फुलेंचे स्त्री शिक्षणाचे विचार व कार्य व्यक्त केले , प्रा. उमरीवाड एस. एन म्हणाले सावित्रीबाई फुले कृतिशील व्यक्तिमत्व देशातील मुलगामी प्रश्नावर हातोडा मारण्याचे कार्य त्यांनी केले लिंग समभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले स्त्री शिक्षणाच्या पुरस्करत्या सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक, शिक्षण तज्ञ्, लेखिका, कवयित्री होत्या त्यांच्या कार्यामुळे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. नीता वाणी यांनी केले आभार प्रा. प्रदीप तायडे यांनी मानले.


