तसेच प्रा. संदिप धापसे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करावा लागतो हे फार मोठे दुर्दैव, भाषा माणसाला जीवंत ठेवते पण जीवंत माणसाला भाषा जी तीची मरणासन्न अवस्था झाली आहे. ती दिसत नाही . म्हणून मराठी भाषा टिकविणे साठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच मा. प्रा. गणपतराव ढेंबरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेचे विविध दाखले देवून महत्व पटवून सांगितले. [ads id="ads2"]
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रावेर एक्सरेचे प्रमुख मा. डॉ. ताराचंद सावळे जिल्हा बँक चे विभागाचे अधिकारी मा. अजबराव पाटिल,निवृत्त मुख्य ध्यापक मा.प्रभाकर रायमडे, तसेच संस्थेचे संचालक दशरथ घेटे, कॉंग्रेस नेते मा. राजु सवर्णे, उमेश गाढे, अनिल घेटे, अशोक घेटे, दिलीप तायडे, विलास लहासे, ज्ञानेश्वर घेटे, कॉंग्रेसचे नेते दिलरूबाब तडवी, शे हारूण , नामदेव महाजन, इकबाल अहमद,मो.रफिक मामु, सम्यक इंगळे, इ . तसेच संस्थेचे अध्यक्ष जगदिश घेटे यांनी प्रास्ताविक करून राजेंद्र अटकाळे यांनी सत्रसंचालन केले तसेच संघरत्न दामोदरे यांनी आलेल्या पाहुव्याचे आभार मानले ग्रंथपाल निलेश तायडे यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिणाम घेतले ......


