छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याची रांगोळीच्या स्वरुपात प्रतिकुती काढून मोठ्या उत्साहात शिवजयंती केली साजरी....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी (दिनेश सैमिरे) 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील तीन चार किलोमीटर अंतरावरील के-हाळा गावातील सर्वज्ञ केला सप्लायर्स चे संचालक प्रविण झेंडू महाजन यांची कन्या कुमारी राखी प्रविण महाजन हिने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखा मानाचा मुजरा केला, तिने शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकुती रांगोळीच्या स्वरुपात आपल्या हाताने अतिशय सुंदर प्रेक्षणीय काढली.[ads id="ads1"]  

  विशेष म्हणजे तिने तब्बल सलग आठ तास दहा फूट उंच आणि पाच फुट रुंदी, तीन किलो रांगोळीच्या माध्यमातून पाच ते सहा विविध प्रकारचे रंगाची स्वतः निर्मिती करुन अतिशय देखणी, रुबाबदार आणि मनमोहक दिसणारी अप्रतिम फोटो सारखीच दिसणारी नेत्रदीपक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून काढाली.[ads id="ads2"]  

हि माहिती तिचे वडील प्रविण झेंडू महाजन यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे यांच्या पर्यंत पोहोचविली. लगेचच विलास ताठे यांनी ती रांगोळीचे दुश्य व्हिडिओ काॅल्स वरुन बघितले आणि ते सुंदर प्रेक्षणीय छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकुती रांगोळी पाहून आनंदित झाले, आणि विलास ताठे यांनी लगबगीने आमदार शिरीष दादा चौधरी यांच्याकडे सविस्तर माहिती दिली.आमदार शिरीष दादा चौधरी रावेर शहरातील शिवजयंती उत्सवाला हजेरीसाठी आले होते.त्यांनी रावेर शहरातील शिवजयंती साजरी करुन विलास ताठे, दिलीप वैद्य सर यांच्या सोबत रांगोळीच्या स्थळी भेट दिली. 

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

यावेळी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी सदर मनमोहक दिसणारी सुंदर प्रेक्षणीय छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याची रांगोळीच्या स्वरुपात प्रतिकुती पाहून आनंदित होऊन कुमारी राखी प्रविण महाजन केरहाळा हिचे भरभरून कौतुक केले,व तिला पेढा भरविला.तसेच तिचे आईवडील यांना तिच्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच राखी प्रविण महाजन हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी आमदार शिरीष दादा चौधरी, युवा नेते धनंजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे, पोलिस पाटील सौ वैशाली पाटील, चंद्रकांत पाटील, भगवान गायकवाड, जेष्ठ पत्रकार दिलीप वैद्य सर सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!