यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील महेलखेडी ग्राम पंचायत अंतर्गत पंधरा वित्त आयोगाच्या अंतर्गत गावांतील तडवी मुस्लीम बांधवांच्या चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ४/७/२०२२ पासून ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार मागणी करूनही काम करण्यास दिरंगाई होत असल्याने आदिवासी तरूण जावेद सूपडू तडवी या तरुणाने आज ग्राम पंचायतीच्या आवारात लोकशाही पद्धतीने उपोषण सुरू केलें असून. [ads id="ads1"]
सादर उपोषणास ग्राम पंचायत सदस्य नामदेव आसाराम झुरकाळे, अशोक तुळशीराम तायडे ,माजी ग्राम पंचायत सदस्य अर्जुन रामा महाजन, प्रमोद हरी महाजन, राजेंद्र सुधाकर पाटील, फत्तू जुम्मा पटेल यांनी उपोषण करत्याची चर्चा करून अडी अडचणी समजून घेतल्या तरी सदर उपोषणाची संबंधीत ग्राम पंचायत काही दखल घेणार का याकडे काही ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.


