मनमाडला नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 22 फेब्रुवारीपासून रंगणार एमपीएल कबड्डीचा थरार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):- नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने मनमाड कबड्डी असोसिएशन यांच्यातर्फे 22 फेब्रुवारी 2023 पासून शहर पातळीवरील एमपीएल अर्थात मनमाड प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा भरविण्यात आले असून पुढील आठ दिवस या कबड्डी स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन आप्पा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.[ads id="ads1"]  

        नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील जय भवानी व्यायाम शाळेवर आयोजित असलेले पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. एकूण सहा संघांमध्ये या स्पर्धा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.    

           यावेळी राजेंद्र पगारे यांनी बोलताना सांगितले की, एकेकाळी मनमाड शहर कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जात होते. अनेक वर्षापासून कबड्डी संपत चालली होती. नाशिक जिल्ह्यात कबड्डीला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी नाशिक जिल्हा कबड्डी असोशियन तर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मनमाड शहरात नुकत्याच आमदार चषक या जिल्हास्तरीय पुरुष महिलांचे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. [ads id="ads2"]  

  यानंतर देखील शहर पातळीवर आणि स्पर्धा पार पडल्या. आता पुन्हा एकदा मनमाड शहरातील रमेश केदारे व बंटी सोनवणे या दोन तरुणांनी जवळपास तीन महिने महिला व पुरुषांचे कबड्डीचे शिबीर घेतले. यातून जवळपास 98 खेळाडूंची निवड करून सहा संघ तयार केले व एम पी एल अर्थात मनमाड प्रीमियम लीग या नावाने शेअर पातळीवरील सामन्यांचे आयोजन केले आहे.

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज

            येत्या 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल येथे या स्पर्धा संपन्न होणार असून रात्रीचे 17 मध्ये सर्व सामने होणार आहेत. या स्पर्धेसाठी नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्यातर्फे 15000 रुपयांचे रोख पारितोषिक तर आकाश वाघमारे यांच्यातर्फे 11000 रुपयांचे, अन्वर पठाण यांच्यातर्फे सात हजार रुपयांची तृतीय पारितोषिक तर पाच हजार रुपयांची पारितोषिक लियाकत शेख यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व असोसिएशनचे नियमानुसार या स्पर्धा पार पडणार असून स्पर्धा मधून प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक स्कोअर देखील काढला जाणार आहे. वाईट वर्तणूक संघाची शिस्त यासह इतर मायनस गुण देखील करण्यात येणार असल्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत.

        यावेळी राष्ट्रीय पंच सतीश सूर्यवंशी, राजेश निकुंभ, सुधाकर कातकडे, वाल्मीक बागुल यांच्यासह मनमाड शहर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!