नाशिक (मुक्ताराम बागुल) नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरांमधील लक्ष्मी नगर येथील लक्ष्मी माता मंदिराचे भूमिपूजन दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी सोमवारी नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.[ads id="ads1"]
गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर बांधण्याची कॉलनीतील नागरिकांची इच्छा होती.परंतु हा विषय सौ. अजूनताईच्या पुढाकारातून मार्गी लागला असून लवकरच या जागेवर लक्ष्मी मातेचे मंदिर बांध पूर्ण होणार आहे. लक्ष्मीनगर मधील नागरिकांनी सौ. अंजुमताई सुहास कांदे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करून मंदिरासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे आभार मानले. अंजुमताईच्या शुभ हस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.[ads id="ads2"]
आपली संस्कृती जतनही काळाची गरज आहे. मंदिर असणे, त्याची दखल देखभाल करणे हेही महत्त्वाचे असल्याचे यावेळी सौ. अंजुमताई कांदे यांनी आपले मत व्यक्त केले. मंदिर झाल्यानंतर त्वरित आमदार निधीतून सभागृह दिला जाईल असा विश्वास ही यावेळी दिला.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्याताई जगताप, मनमाड शहर अध्यक्ष संगीताताई बागुल, नांदगाव शहर अध्यक्ष रोहिणी मोरे, समन्वय भारती बागोरे, शहर उपाध्यक्ष तपासूम शेख, सौ. नावंदर, सौ दुसाने, सौ. डोमाडे, सौ. जावरे,सौ. चांडक, सौ. भारती बोरसे, सौ. गरुड तसेच राजेंद्र मोरे, सतीश शिंदे, दिलीप शेठी, सोमनाथ दुसाने, सचिन काकळीज, नितीन चांडक, अमोल नावंदर, नंदन करवा, ज्ञानेश्वर वाघ, जुगल किशोर अग्रवाल, प्रमोद चव्हाण, दामोदर डोमाडे, आदी यावेळी उपस्थित होते. सौ प्रियांका पाटील मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.



