नाशिक (मुक्ताराम बागुल) शहरातील प्रभाग क्रमांक 16 सागर टाकळी परिसरातील समस्या न सुटल्यास महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांनी दिला आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री चंद्रकांत फुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 16 सागर टाकळी येथील उघड्या नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्यावर लवकरात लवकर धापे टाकून झाकण्यात यावा. सर्वे नंबर 39 मधील कपडा नसलेली विहीर तातडीने बुजवावी तसेच सहारे बाई कट्टा समता नगर येथे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर तसेच साफसफाई कामात दिरंगाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी असे निवेदन देण्यात आले आहे. [ads id="ads2"]
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते युवा नेते आकाश नानाभाऊ साळवे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे अधिक पदाधिकारी, कार्यकर्त े यावेळी उपस्थित होते.


