नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास प्रवासी रेल्वे गाड्या आणि हजारो प्रवासांनी गजबजलेल्या मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावर रेल्वेवर शब्द वर धावत्या रेल्वे गाडीला भीषण अपघात झाला. [ads id="ads1"]
दोन प्रवासी बोजा एकमेकांवर धडकून एक बोगी दुसऱ्या बोगीवर आदळल्याने मोठा आवाज झाला. अपघाताचे रेल्वेचे सायरन वाजले आणि अवघ्या काही वेळात एनडीआरएफ पथकासह रेल्वे प्रशासकीय इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. अत्यंत वेगाने त्यांनी मदत कार्य करून जखमींना बाहेर काढले. अवघ्या 42 मिनिटात या अपघातावर सर्व पुतळ्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.[ads id="ads2"]
या अपघातामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी झाले तर पाच प्रवाशांना मार लागला. पण अखेर गाडीतील सर्व प्रवाशांचे जीव वाचले. वित्तहानी टळली. परंतु हा काही खरोखरचा रेल्वे अपघात नव्हता. तर मनमाड सारख्या जंक्शन रेल्वे परिसरात मोठ्या रेल्वे अपघाताची घटना घडल्यानंतर तात्काळ सर्व यंत्रणा किती सक्षम आहे. रेल्वेचे बचाव, यातायात व मदतकार्य किती तातडीने उभे राहू शकते याचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेली आहे मॉकड्रिल होते.