रावेर प्रतिनिधी ( दिनेश सैमिरे ) येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कापसाला 12 हजार रुपये भाव प्रति क्विंटल द्या अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष (किसान सेल ) जिल्हाप्रमुख सुरेश चिंधू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना देवुन केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त करून सरकारला शेतकऱ्यांच्या भावना कळवाव्या अशी मागणी निवदेनाद्वारे केली आहे . [ads id="ads1"]
आज दि.२० फेब्रुवारी सोमवार रोजी रावेर येथे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी विक्री लवकरच सुरू करा, व त्यांना १२ हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
जर आठ दिवसांमध्ये कापसाची खरेदी विक्री सुरू न झाल्यास व शेतकऱ्याला 12 हजार रुपये भाव मिळाला नाही , तर आठ दिवसानंतर रस्ता रोको आंदोलन करू असा इसारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रावेर तहसीलदार यांना देण्यात आला आहे.याप्रसंगी प्रहार शेतकरी जिल्हा प्रमुख सुरेश चिंधु पाटील,प्रहार रावेर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ धांडे, प्रहार अल्पसंख्याक रावेर तालुका अध्यक्ष वसीम शेख, दिनेश भाऊ सैमिरे, फिरोज भाई तडवी, शाकीब भाई, सुधीर पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश दादा यांच्यासह असंख्य प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ता व शेतकरी उपस्थित होते.