शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केले नृत्यविष्कार
-----------------------------------------------------------
"यादरम्यान अल्पसंख्य समाजाचे सुप्रसिद्ध उद्योजक बाबुशेठ यांचे चिरंजीव जाफर हुसैन शब्बीर हुसैन व केळी व्यापारी सलीम शेठ यांचे चिरंजीव शेख अरबाज शेख सलीम या दोघे युवकांनी सी.ए.ची पदवी प्राप्त करून सावदा शहराचे नाव बुलंद केल्याने मान्यवरांच्या हस्ते या दोघांनाही पुष्पगुच्छ सह "गोहरे नायाब" या स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले."
-----------------------------------------------------------[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे अलकवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित खाजगी उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने आज दि.२१ फेब्रुवारी रोजी जैहरा हॉलमध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात ईश्वराचे पवित्र नावाने करण्यात आली.[ads id="ads2"]
यानंतर कार्यक्रमाचे संस्था अध्यक्ष तथा कृ.उ.बा.समितीचे संचालक सैय्यद अजगर,संस्था उपाध्यक्ष युसूफ शाह,डायमंड इंग्लिश मीडियम शाळेचे संस्थापक हाजी हारुन शेठ,संस्था सचिव आयुब खान सर,अजमल खासाब, मुख्याध्यापक जाफर खान,मुराद तडवी,सुलतान खान,डायमंड शाळेचे प्राचार्य शहादा सर,या मान्यवरांनी दिप प्रज्वलन केले.तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
हेही वाचा :- सावद्यात दोन गटात हाणामारीत पोलीसांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल!
हेही वाचा :- माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त सावद्यात भिमगीतांचे आयोजन
या कार्यक्रमात खाजगी उर्दू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व अति उत्तम रित्या विविध गीतांवर नृत्यविष्कार सादर केले.याप्रसंगी उद्योजक शब्बीर हुसैन अख्तर हुसैन उर्फ (बाबू सेठ),पत्रकार फरीद डायमंड शाळेची प्राचार्य लक्षमी फूल्लीवार,डॉ.इमरान फैजपूर,केळी व्यापारी सलीम सेठ,शफी ड्रायव्हर,शिक्षक जुबेर शेख,अर्शद सर,फिरोज सर, शेख,अकील डायनामा,नजीर शेख,खाजगी उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी सह मोठ्या संख्येने महिला व पुरुष पालक वर्ग उपस्थित होते.


