नेहरू युवा केंद्र आणि नक्षत्र फाउंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम.
यावल (सुरेश पाटील) भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि नक्षत्र फाउंडेशन यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा नेतृत्व एवं सामुदायिक विकास प्रशिक्षण शिबिर दि.4,5 व 6 फेब्रुवारी दरम्यान इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल दोनगाव येथे घेण्यात आले.यामध्ये जिल्ह्यातून निवडक 40 युवक युवतींचा समावेश करण्यात आला होता. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव वन विभागाचे प्रमुख विवेक होशिंगे,महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष देवयानी गोविंदवार,आपण पब्लिकेशनचे संस्थापक मनोज गोविंदवार,नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर,अमित मोहिते सर, शाळेचे प्राचार्य अशोक पाटील सर यांच्या उपस्थित झाले.तर समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा कृषी विभागाचे उप संचालक अनिल भोकरे,संस्थेचे संचालक मनीष पाटील,जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या उपस्थित झाला. दोनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष व्हीं.डी.पाटील व संस्थेचे संचालक मनीष पाटील यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच या तीन दिवसीय शिबिरात विविध मान्यवरांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]
या शिबिरात काही युवा उद्योजक, युवा शेतकरी यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली या सोबत पथनाट्य सादरीकरण, खेळ असे उपक्रम घेण्यात आले.असे नेहरू युवा केंद्र जळगाव युथ लीडर तेजस धनंजय पाटील यांनी सांगितले. या शिबिरातून युवकांच्या जीवनाला एक सकारात्मक दृष्ट्या नवीन कलाटणी देणारा अनुभव मिळाला असे प्रतिपादन सहभागी युवक युवतींनी केले.