यावल ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग नोंदणी शिबिरात २५० गरजूंची तपासणी व नोंदणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल  ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग नोंदणी शिबिरात २५० गरजूंची तपासणी व नोंदणी

यावल (सुरेश पाटील) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार द्वारा मा.खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने भारत सरकारच्या एडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी तालुकास्तरीय शिबिर यावल ग्रामीण रुग्णालयात रावेर लोकसभेच्या खा.श्रीमती रक्षाताई खडसे,यावल तहसीलदार महेश पवार,भावी लोकप्रतिनिधी तसेच डॉ.कुंदन फेगडे,गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड,डॉ. शिवदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले शिबिरात एकुण २५० दिव्यांग गरजूंची तपासणी व नोंदणी करण्यात आली यासाठी शिबिरात त्यांना जागेवरच मंडळ अधिकारी व तलाठी यांनी दाखले दिले. [ads id="ads1"]  

       तहसीलदार महेश पवार यांनी अपंग बांधवांच्या दारिद्र रेषेखालील रेशनिंग कार्ड संदर्भात व इतर काही तक्रारी संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले,तसेच अपंग बांधवांनी योग्य कागदपत्र कांची पूर्तता करून कोणाचेही हस्ते कागदपत्रे पाठवली तर निश्चित आपण त्यांना सहकार्य करू असे स्पष्ट केले याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांनी शासनाच्या या विविध योजना ज्या आहेत त्या गरिबातल्या गरीब अपंगापर्यंत पोहोचवणे हे साऱ्या कार्यकर्त्यांचं व नागरिकांचे कर्तव्य आहे जेणेकरून त्याचा लाभ सर्वांना घेता येईल यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. [ads id="ads2"]  

 तर माजी जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी अपंग बांधवांच्या अडीअडचणी समजून यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चव्हाण तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी चौधरी व भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,सरचिटणीस विलास चौधरी,माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, सौ.सविता ताई भालेराव, अतुल भालेराव,उज्जैनसिंग राजपूत, पंचायत समिती माजी सदस्य योगेश भंगाळे,बाळू फेगडे,किशोर कुलकर्णी,डॉ.निलेश गडे, सक्रिय कट्टर समर्थक कार्यकर्ता व्यंकटेश बारी,युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी शहराध्यक्ष रितेश बारी,योगेश चौधरी,उदय बावस्कर व त्यांचे सर्व सहकारी शहरातील व तालुक्यातील सर्व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी व यावल आणि न्हावी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय स्टाफ,या प्रसंगी उपस्थित अपंग बांधवांचे तपासणी केली व नोंदणी केली. जवळ जवळ दिवसभरातून सहाशेनोंदणी करण्यात आली.

अपंग बांधवांनी आपली नाव नोंदवलेली आहेत लवकरच तारीख ठरवून खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते पात्र दिव्यांग बांधवांना कुत्रीम अवयव,पुरवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.शिवदास चव्हाण सूत्रसंचालन राकेश फेगडे यांनी तर आभार प्रदर्शन नानासाहेब घोडके यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!