यावल (फिरोज तडवी ) आपल्या एक वर्षाच्या लहान बाळाला भेटायची शेवटची ईच्छा व्यक्त करीत आपल्या मित्राकडे मोबाइलवर बोलतांना एका विवाहित आदीवासी तरूणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुदैवी घटना घडल्याचे वृत्त आहेे. [ads id="ads1"]
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की , यावल-सातोद रस्त्यावरील सुनिल भाऊसाहेब भोईटे यांच्या गट क्रमांक २४२ मधील शेतातील विहीरीत दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आवेश दगडु तडवी वय - ३० वर्ष राहणार बिडगाव मोहरद तालुका चोपडा ह . मु .यावल या विवाहीत तरुणाने आपल्या मुलाला भेटयाचे आहे असे मित्राला मोबाइल वरून सांगीतले व विहीरीत उडी घेत पाण्यात बुडुन आत्महत्या केली. [ads id="ads2"]
विहीरी जवळील रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटरसायकल व बिहीरीच्या काठावर पडलेल्या चप्पलवरून सदर या विवाहीत तरूणाने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मयत आवेश तडवी यास पत्नी व एक वर्षाचा लहान बाळ असुन , काही दिवसापुर्वी तो सावखेडाl सिम तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात संगणक ऑपरेटर म्हणुन काम करीत असे. त्यानंतर तो खाजगीत नागरीकांच्या संगणकीय सुविधा कार्य करीत होता. दरम्यान त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ठ होवु शकले नाही . घटनेचे वृत्त कळताच यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी घटनास्थळी आपल्या सहकार्यांसह धाव घेत मयताचे प्रेत विहीरीतुन बाहेर काढण्यासाठी तडवी कुटुंबास मदत केलीी. मागील चार ते पाच तासांपासुन विहीरीस पाणी अधिक असल्यावे मयताचे प्रेत शोधण्यास विलंब होत आहे . पोलीस घटनास्थळी उपस्थित आहे.


