ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्रांतर्गत भारत सरकार आणि विविध सामाजिक संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांचे अर्ज भरण्याबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. [ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याबाबत ची नियमावलीची माहिती दिली तसेच विविध सामाजिक संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्यांची माहिती दिली. शिष्यवृत्तीचा उपयोग शैक्षणिक कामांकरिता करून स्पर्धा परीक्षा देण्यास प्रोत्साहन दिले. [ads id="ads2"]
सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्रसंचलन समान संधी केंद्रांचे समन्वयक प्रा. एस. पी.उमरीवाड यांनी केले. या कार्यक्रमात ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गोपाळ महाजन, डॉ. निता वाणी, डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. यास्मिन पटेल, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. प्रदिप तायडे, प्रा. अक्षय महाजन, श्री श्रेयश पाटील यांनी परिश्रम घेतले.


.jpg)