रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधि (दिनेश सैमिरे) सरस्वती शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळ विवरे संचलित, सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads1"]
कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन श्री महेंद्र दयाराम पाटील ,सचिव सौ. संगीता महेंद्र पाटील ,मुख्याध्यापक श्री कुंदन महाजन ,पर्यवेक्षक श्री मिलिंद दोडके ,हिंदुस्थान स्काऊट & गाईडचे प्रशिक्षक श्री नारायण कोळी व शिक्षक वृंद उपस्थित होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे चेअरमन , सचिव , मुख्याध्यापक यांनी शेकोटीला प्रज्वलीत करून तसेच पुजा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. शेकोटी कार्यक्रमात इयत्ता ३ री ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसाहित्यातील आदिवासी लोकगीत नृत्य ,गुजराती नृत्य ,विविध जाती धर्मातील एकात्मता गीत, कोळी नृत्य तसेच साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला पूर्ण परिवारासह आला हे लोकगीत कार्यक्रमाचे आकर्षण ठरले,या गीतात सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला.हिंदुस्थान स्काऊट & गाईडचे प्रशिक्षक श्री नारायण कोळी यांनी सहकार्य करून मोलाचे मार्गदर्शन केले.
हेही वाचा :- रेल्वेच्या धडकेत निंभोरा येथील युवकाचा मृत्यू : निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री डिगंबर चौधरी यांनी केले,तसेच आभार प्रदर्शन शिक्षक श्री नरेंद्र एस पाटील यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.