जिल्हा पुरवठा अधिकारी, यावल तहसीलदार नाचवता आहेत कागदी घोडे
यावल(सुरेश पाटील) तालुक्यात श्रीमंत बागायतदार धनाध्य यांचे पिवळे रेशन कार्ड व प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड तात्काळ रद्द करण्याची मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनचे यावल तालुका अध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व यावल तहसीलदार यांच्याकडे केली होती आणि आहे परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी यावल तहसीलदार व पुरवठा विभाग यावल हे प्रत्यक्षात कार्यवाही न करता आपआपसात पत्र व्यवहार करून फक्त कागदी घोडे नाचवित असल्याने निवेदनात दिल्या नुसार भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा युनिट व तालुका युनिट तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. [ads id="ads1"]
भीम आर्मी यावल तालुका अध्यक्ष प्रवीण डांबरे यांनी यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,संपूर्ण यावल तालुक्यात आणि यावल शहरात अनेक पिवळे रेशन कार्ड व प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्डधारक हे बागायतदार धनाध्य असून शासनाची दिशाभूल करून पिवळे रेशन कार्ड द्वारे व प्राधान्य कुटुंब रेशन कार्डद्वारे मोठ्या प्रमाणात गहू,तांदूळ, ज्वारी,मका,साखर इत्यादी धान्य प्राप्त करीत आहेत. [ads id="ads2"]
शासन नियमानुसार या योजनेचा लाभ गोरगरीब जनतेला व गरजूंना मिळाला पाहिजे परंतु खऱ्या लाभार्थ्यांना वगळून हा लाभ अति श्रीमंत कुटुंबांना तसेच लाखोंची प्रॉपर्टी असलेल्या कुटुंबांना,शेकडो प्लॉटिंग असलेल्या कुटुंबांना, बागायतदार कुटुंबांना पिवळे रेशन कार्डचा व प्राधान्य कुटुंब रेशन कार्डचा लाभ मिळत आहे. तरी यांचे पिवळे व प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड तात्काळ रद्द करून खऱ्या गरजूं लाभार्थ्यांचा शोध मोहीम सुरू करून हा लाभ गोरगरीब जनतेला मिळवून द्यावा अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा युनिट वही यावल तालुका युनिटच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन दिले होते आणि आहे.
निवेदन दिल्यानंतर गेल्या पाच महिन्यात जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, यावल तहसीलदार महेश पवार यांनी फक्त आप-आपसात कार्यालयीन पत्रव्यवहार करून तक्रारदार,अर्जदाराची दिशाभूल करून प्रत्यक्षात कारवाई न करता कागदी घोडे नाचविले आहेत. त्यामुळे आता यावल तालुका भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे लवकरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रवीण डांबरे, सचिन पारधे, बबलू गजरे आकाश बिराडे,करण गजरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितले.



