फैजपुर तालुका यावल प्रतिनिधी(सलीम पिंजारी )
फैजपूरात संस्कृत शास्त्री संमेलनाला सुरुवात
नगरपरिषदे जवळ असलेल्या श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाच्या संस्कृत संमेलनाला शनिवारी सकाळी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.[ads id="ads1"]
हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. पहिल्या सत्राचे आचार्य बाभुळगावकर बाबाजी शास्त्री करमाड हे होते. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष तपस्वीनी सोनाली शास्त्री नागापूरकर ह्या होत्या.[ads id="ads2"]
व्यासपीठावर न्यायमबास बाबा शास्त्री, मकरधोकडा , माहूरकर बाबा, माहूर, साळकर बाबा धुळे, लाड बाबा हरसूल,कृष्णराज बाबा शास्त्री शिक्रापूर, गो दी शास्त्री पातुरकर अहमदाबाद, रुद्धपुरकर बाबा शास्त्री अजिंठा, हरबास बाबा शास्त्री नांदेड, जिंतूरकर बाबा शास्त्री भुसावळ, खाडे बाबा शाश्त्री, युवराज शास्त्री पारगाव, जावळे बाबा शास्त्री सावदा, संतराज बाबा शास्त्री शहाबाद पंजाब , कान्हेराज बाबा कपाटे महेलखेडी, ऋषीराज दादा भोजने गुजर खर्दे व आदी शास्त्री समुदाय गण उपस्थित होते. माजी आमदार राजाराम गणू महाजन यांचीही उपस्थिती होती.
शास्त्री म्हणजे जाणता, चिंतन कर्ता, मंदिराजवळ जाण्याचे प्रवेशद्वार. किर्तन परंपरा ही महानुभावांची आहे. कीर्तनात सुत्राची बैठक असावी. महानुभावांचा कीर्तनकार हा वेगळा भासला पाहिजे. आपला वेगळापणा भासला पाहिजे. शास्त्री संमेलनाची समिती तयार करा. समता सुद्धा ममतेने सांगता आली पाहिजे. नदीत पोहत असालतर काठावर येण्याची ताकद पाहिजे. असे चिंतनी जनक बाबा यांनी शास्त्री संमेलनात मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे नवीन दिशा होय. पंथांसाठी स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असतं एकत्र आल्याशिवाय कुठलेच कार्य सिद्ध होत नाही. समता आणि विषमता ही संपली पाहिजे मनातील कडू भावना समजून नवीन काही करण्याची जिद्द असायला हवी. आपला थोडासा वेळ जरी आपण या गुरुकुल साठी दिला तरी संस्था अजून नावारूपाला येईल. महानुभाव पंथासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे असे द्वितीय सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाली शास्त्री नागापूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यांनी केली मनोगत व्यक्त
सुमनताई शास्त्री फलटण,न्यायव्यास बाबा शास्त्री, मकरधोकडा , अमृतराज शास्त्री जिंतूरकर, मुकुंदराज बाबा शास्त्री नागपूर, निलम शास्त्री विराट,श्रीनिवास शास्त्री फलटण,विनोद शास्त्री, सुमनताई शेवलीकर तरडगाव, अमृतराज शास्त्री मेहेकरकर, प्रा. डॉक्टर गोविंद शास्त्री जामोदेकर, पार्थशास्त्री विद्वास, स्नेहल शास्त्री पंजाबी, आचार्य पातूरकर बाबा शास्त्री अहमदाबाद, सारंगधर बाबा शास्त्री बिडकर, अंमळनेर, पूजा शाश्त्री शेवलीकर छत्रपती संभाजीनगर कार्यक्रमासाठी मानेकर बाबा शास्त्री,प्राचार्य राजधर बाबा शास्त्री, कृष्णराज बाबा शास्त्री, राजू बांधकर, हरीपाल शास्त्री, श्याम शास्त्री, प्रदीप महाराज खिर्डी, प्राध्यापक राजधार बाबा, मुकुंदराज बाबा , मधुसूदन दादा शाश्त्री
यांनी संमेलनासाठी परिश्रम घेतले.
संस्कृत नाटिका सादरी करण्याचे मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर गोविंद शास्त्री जामोदेकर यांनी केले यात प्रामुख्याने उज्वल तळेगावकर, मोनाली लासूरकर, नैना पंजाबी, प्रज्ञा अंकुळनेरकर, श्रद्धा अंकुळनेरकर या शास्त्रींनी सहभाग घेतला.
यांचा झाला सन्मान
महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार प्राप्त आचार्य बाभुळगावकर बाबा करमड यांचा संस्कृत महाविद्यालय कडून स्मृतिचिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आला.