यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील कोसगाव येथे श्री पांडुरंगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्ताने श्री शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 16 मार्च ते 23 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे.[ads id="ads1"]
श्रीहरी पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊली व श्री संत मुक्ताबाई यांच्या कृपाशीर्वादाने,गुरुवर्य हरिभक्त परायण शारंगधर महाराज मेहुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमहापुराण व अखंड हरिनाम शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताह कोसगाव तालुका यावल येथे आयोजित करण्यात आला आहे.
शिव महापुराण कथा प्रवक्ते म्हणून,मेहूण येथील प्रवक्ते म्हणून हरिभक्त पारायण, समाधान महाराज,हे लाभलेले आहेत.[ads id="ads2"]
दैनंदिन कार्यक्रमात दररोज या कालावधीत सकाळी पाच ते सहा काकडा आरती,शिव महापुराण कथा रोज सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 तसेच 5 ते 6 हरिपाठ रात्री 8 ते 10 हरिनाम संकीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे तर दि. 16 ते 22 या कालावधीत हरिभक्त परायण भानुदास महाराज भुसावळ, दुर्गादास महाराज खिर्डी, कोमलसिंग महाराज खेडी भोकरी आळंदी,ज्ञानेश्वर महाराज मेहून,स्वप्निल महाराज आळंदी,सुनील महाराज करकी,संभाजी महाराज मेहूण आणि 23 मार्च 23 रोजी सकाळी नऊ ते 11 या कालावधीत गुरुवर्य शारंगधर महाराज मेहूण यांची काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे काल्याच्या कीर्तनानंतर, कैलासवासी वामन,चिंधू पाटील यांच्या स्मरणार्थ, सोपान वामन पाटील यांच्या हस्ते होईल.
हेही वाचा:- भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळ एसटीच्या धडकेत तीन जण तरुण ठार
हेही वाचा :- एका महिलेची हत्या करुन गोणपाटात मृतदेह टाकून फेकून दिल्याची घटना उघडकीस ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना
महाप्रसाद 12 ते 4 वाजेच्या दरम्यान संपन्न होईल दि. 23 मार्च रोजी संध्याकाळी 4 ते 6 दिंडीचा कार्यक्रम आणि रात्री 8 ते 10 भारुड आयोजित करण्यात आले आहे,या कार्यक्रमात कैलास वाशी चंद्रभान वामन पाटील यांच्या स्मरणार्थ, रवींद्र चंद्रभान पाटील यांच्यातर्फे श्री विठ्ठल मंदिर साठी मंडप बक्षीस देण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांना दररोज,वनोली कठोरा दुसखेडा,रिधोरी कासवा,मांगी,करंजी, चुनवाडी,आमोदा,फैजपूर, बामणोद,म्हैसवाडी, पाडळसा,भोरटेक,गहूखेडा, सुदगाव,रायपूर,विरोदा,न्हावी कळमोदा,सावदा, थोरगव्हाण,अकलूद,पिळोदा, म्हेसवाडी येथील भक्त मंडळ आणि भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचा,ज्ञानदानाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल मंदिर कोसगाव येथील व परिसरातील सर्व भजनी मंडळ यांनी केले आहे.


