मुंबई (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आयोजित श्रीक्षेत्र पंढरपुर येथील शाहिरी प्रशिक्षण शिबिरासाठी मेहकर तालुक्यातील दे माळी च्या लोकशिक्षण सांस्कृतिक कला संचाचे सुप्रशिद्ध युवा लोककलावन्त शाहिर गजेंद्र गवई यांची शाहिरी प्रशिक्षक म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई चे संचालक बिभीषन चवरे यांनी नेमणूक केली आहे.[ads id="ads1"]
सदर चे शाहिरी प्रशिक्षण १३ मार्च ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत सद्भावना भवन, श्रीक्षेत्र पंढरपुर येथे शिबिर संचालक शाहिर सुभाष गोरे यांनी नियोजित केले आहे.
या शाहिरी शिबिरात महाराष्ट्रातिल नामवंत शाहीरांचे व्याख्यान,तथा पावड़े गायन,शाहिरी परंपरा व इतिहास,शाहिरी ते शाहिरी वाङ्गमय,डफ सादरिकरणाचे महत्व,पारंपरिक ओवीची मांडणी,शाहिरी साहित्यातील विविध अंगाची ओळख,शाहिरी फटका तथा ऐतिहासिक पोवाड़े,स्वातंत्र्य लढयातील शाहीरांचे योगदान,समाजपरिवर्तनातील शाहीरांचे योगदान, शाहिरी क्षेत्रात महिलांचे योगदान,भेदिक शाहिरी,प्रसार माध्यमाद्वारे शाहिरिची वाटचाल,लोकलेचा अभ्यास व चर्चा,मनोरंजनातून प्रबोधन शाहिरी,हिंदी, मराठी, कानडी भाषेतुन केलेली शाहिरी मांडणी,दूरदर्शन, मीडिया वरील शाहिरी सादरिकरण,या सारख्या विविध विषयावर महाराष्ट्रभरातील सुप्रसिद्ध नामवंत शाहिर सहभागी होत आहेत.[ads id="ads2"]
या शाहिरी प्रशिक्षण शिबिरासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एकमेव मुंबई विद्यापीठ ,लोककला अकादमी प्रशिक्षित लोकलेतिल पद्वयुत्तर पदविका लोककला सादरिकरण(मास्टर डिप्लोमा इन परफोर्मिंग फोक आर्ट्स) प्रा गजेंद्र गवई यांची शाहिरी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
गजेंद्र गवई यांचा लोकशिक्षण कला संच ,दे. माळी गेल्या अनेक वर्षापासून भारत सरकारच्या सूचना व प्रसारन मंत्रालय च्या गीत व नाटक प्रभाग अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालय अंतर्गत नोंदनीकृत असुन शासनाच्या विविध विभागाचे हजारों जनजागृती कार्यक्रम सादर करत आहेत, सांस्कृतिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल गजेंद्र गवई यांना अनेक पुरस्कार,सन्मान मिळालेले आहेत.
युवा लोकशाहीर प्रा गजेंद्र गवई सदर शाहिरी प्रशिक्षण शिबिरातील सहभागी शिबीरार्थीना दिनांक ३१/०३/२०२३ रोजी प्रथम सत्रात "महापुरुषाच्या जीवन चरित्रावर शाहिरीतुन मांडणी" या विषयावर प्रशिक्षक म्हणून मांडणी करणार आहेत.
सदर निवड़ी बद्दल जिल्ह्यातील लोककलावन्त, शाहिरी, पत्रकार,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून युवा लोकशाहीर प्रा गजेंद्र गवई यांचे अभिनन्दन करण्यात येत आहे..