नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरालगत अवैध पेट्रोल साठा जप्त; मनमाड शहर पोलिसांची कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील जवळच असलेल्या मनमाड शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत अवैध पेट्रोल साठा जप्त केला असून यामध्ये एका आरोपीला अटक करू त्यांच्याकडून सुमारे 40 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी बी थोरात यांनी दिली.[ads id="ads1"]  
       याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनमाड शहर लागत असलेल्या इंधन कंपनीच्या टँकर मधून अवैधरित्या पेट्रोल डिझेल काढून ते विकण्याचा धंदा सुरू असल्याची गुप्त  माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाली.  मिळालेल्या गुप्त माहितीच्या‌ आधारावर मनमाड शहर पोलिसांनी सापळा रचुन चांदवड रोडवरील पाटील पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या एका बिल्डिंग मधील फ्लॅट क्रमांक 66 मध्ये रेड केली. या ठिकाणी वीस लिटरच्या दोन कॅन पेट्रोल काढण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली असून. या ठिकाणाहून कल्पेश दीपक आहेर वय वर्ष 27 याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.[ads id="ads2"]  
       कल्पेश दीपक आहेर यास पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक बी बी  थोरात पीएसआय पि.डी. सारवर, पोलीस नाईक पी.एन नरोटे, गौरव एस गांगुर्डे, संदीप झाल्टे, रणजीत चव्हाण, राजेंद्र खैरनार आदींनी सहभाग नोंदवला होता. 
......................................... मनमाड शहर परिसरातील अवैध धंदे खपवून घेणार नाही;-पोलीस निरीक्षक बी.बी.थोरात मनमाड शहर
       मनमाड शहरात परिसरात इंधन कंपनी आहे. या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल चोरी होत होती. मात्र सध्या परिस्थिती तशी नाही. तरी देखील काही गुन्हेगार चोरी करत असतात. अशाच प्रकारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून मनमाड शहर व आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतली जाणार नाही. अशावर कठोर कारवाई करून समोर उच्चाटन करण्यात येईल अशी माहिती मनमाड शहर
बी.बी.थोरात यांनी बोलताना दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!