फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी (सलीम पिंजारी)
फैजपुर येथून जवळ असलेल्या पाडळसे पिळोदा बु., कोसगाव वनोली , रिधुरी , दुसखेडा तालुका यावल परिसरात अवैध वृक्षतोड पाडळसे परिसरात दररोज शेकडो लिंबाच्या झाडाची दिवसाढवळ्या वृक्षतोड सुरु असून याकडे वनविभागासहा सर्वच शासकिय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहे .[ads id="ads1"]
पाडळसे परिसरात दररोज वृक्षतोड करण्यासाठी मारुळ गावातून दररोज चार रिक्षामधून अत्याधुनिक मशीनसह घेऊन माणसे आणली जातात आणि काही शेतकरी आपल्या शेतातील बांधावरील कडूलिंब अल्पदरात पाडळसे गावातील व्यापाऱ्यांना विक्री करतात तसेच पाडळसे पिळोदा रस्ता (मनुदेवी रस्ता ) ह्या वृक्ष तोडणाऱ्या व्यापाऱ्याने पाडळसे पिळोदा या गावातील प्रतिष्ठित लोकांना रंगीत पार्टी दिल्याची परिसरात चर्चा आहे लिंबाची लाकडे तोडून चारचाकी वाहनातून[ads id="ads2"] विटभट्या आणि भुसावळ एमआयडिसी मध्ये लाकडे जाळण्यासाठी वाहतुक करण्यात येते शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा हा नारा देऊन दरवर्षी कोट्यावधीचा खर्च केला जातो आणि इकडे मात्र अवैध वृक्ष तोडणाऱ्यावर कार्यवाही करीत नाही आतातरी वनविभाग व संबधीतानी या वृक्ष तोडणाऱ्यावर कार्यवाही करावी