रावेर (हमिद तडवी) रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. व्ही. दलाल हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क.ब .चौ .उ .म . वि सिनेट सदस्य डॉअनिल पाटील व आय क्यू ए सी कॉर्डिनेटर एस आर चौधरी हे उपस्थित होते.[ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा.चांदणी समर्थ ह्या होत्या. प्राध्यापक एस.डी. धापसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.ग्रंथपाल बी .जी . मुख्यादल यांनी आभार मानले .एम .डी . तायडे हे ही उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ एस . बी . गव्हाड यांनी केले होते . राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते .


