रावेर/मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथील माजी सरपंच तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चे सर्वप्रथम पुरस्कार दलितमित्र पुरस्कार दिल्ली प्राप्त अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक शेख चांद.शेख नबी उर्फ कालु मिस्तरी यांची नुकतीच अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेश समन्वयक पदी निवड मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.[ads id="ads1"]
जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनाच्या सभागृहात जळगाव जिल्ह्यातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांची जिल्हा बैठक संपन्न झाली या बैठकीत शेख चांद शेख नबी उर्फ कालू मिस्तरी यांची अविरत जनसेवा सरपंच पदस्थ असतांना मोठा वाघोदा गावात विविध प्रकारच्या विकास कामांची विकास गंगा खेचून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील प्रतिष्ठीत नावलौकिक माजी सरपंच कालु मिस्तरी यांना अखिल भारतीय सरपंच परिषद अल्पसंख्यांक प्रदेश समन्वयक पदी निवड करण्यात आली.[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थापक प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य माननीय दादासाहेब जयंतराव पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले विशेष अतिथी राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे जिल्हा कार्याध्यक्ष वासुदेव नरवडे रामेश्वर भाऊ राजू सवर्णे आदींसह जिल्ह्यातील सरपंच व अधिकारी उपस्थित होते