येथील बाजार समितीच्या सभापती कक्षात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप वैद्य होते .सुरवातीला व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना ऑनलाईन मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वाधिक प्राधान्याने सोडवला पाहिजे त्यासाठी सर्व सदस्य पत्रकारांचा ग्रुप इन्शुरन्स काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणातील अडीअडचणी सोडविणे, त्यांच्या ऍडमिशन साठी मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनेच्या सदस्यत्वासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही असे सांगून पत्रकारांमध्ये आपापसात स्पर्धा नसावी, ती वृत्तपत्रांत/ चॅनेल्स मध्ये असते. आपण पत्रकारांनी आपले व्यक्तिगत संबंध जोपासण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या
बैठकीत संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद टोके, चिनावल आणि चंद्रकांत विचवे उपस्थित होते.९ एप्रिलला अमळनेर येथे संघटनेचा जिल्हास्तरीय कुटुंब मेळावा होणार असून सर्वच पत्रकार बंधूंनी कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.निवड झालेल्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे श्री वैद्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व आभार मानले.