रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
मुलींनो आत्मनिर्भर होत असताना आपल्या जबाबदारीचे भान ठेवा असे वक्तव्य रावेर तहसीलदार सौ. उषाराणी देवगुणे यांनी रावेर येथील श्री.व्ही.एस. नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या वतीने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान सप्ताह समारोप प्रसंगी केले. [ads id="ads1"]
महाविद्यालयात सात दिवशीय आत्मनिर्भर युवती अभिमान कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगांव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले होते, त्यानिमित्ताने महाविद्यालयात वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,ज्या मध्ये पहिल्या दिवशी रावेर पोलीस स्टेशन ला महाविद्यालयातील विदर्थिनींनी भेट दिली या वेळेस पोलीस प्रशासन मध्ये कामकाज कसे चालते याचे मार्गदर्शन रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.कैलास नागरे यांनी केले,तर दुसऱ्या दिवशी रावेर तालुका कृषी प्रवेक्षक श्री.सचिन गायकवाड यांनी सेंद्रिय शेती संबधी सविस्तर माहिती दिली.[ads id="ads1"]
बँकिंग प्रणाली व तंत्रज्ञान या विषयावर बँक ऑफ महाराष्ट्र, रावेर शाखाधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.तर तिसऱ्या दिवशी पत्रकारिता व समाज आणि स्टार्टअप मध्ये संधी या विषयावर श्री. दिपक नगरे ( उपसंपादक, लोकशाही )आपाले सखोलपणे विचार मांडले.याच अभियानअंतर्गत प्रा.सीमा बारी धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर )यांनी ताणतणाव मुक्त जीवन या विषयावर मुलींचे समुपदेशन केले,तर शासकीय योजना आणि रोजगार संधी या विषयावर अश्विनी जोशी मॅडम यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तर वाघोड ग्रामीण रुग्णालय चे आरोग्य कर्मचारी श्री.वैभव गाढे यांनी मुलींची हिमोग्लोबिन तपासणी केली.
या कार्यक्रम समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते कॅप्टन, प्रा.राजेंद्र राजपूत( धनाजी नाना महाविद्यालय,फैजपुर ) हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था चेअरमन श्री.हेमंतशेठ नाईक हे होते तर विचारमंचवर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य- डॉ. पी.व्ही.दलाल व कबचौउमवी, जळगांव सिनेट सदस्य डॉ.अनिल पाटील यांची होती.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सत्यशील धनले यांनी केले,तर सूत्रसंचालन प्रा.संदीप धापसे यांनी केले ,तर आभार युवती सभा प्रमुख प्रा.नरेंद्र घुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.बी.जी.मुख्यद्ल, प्रा.चतुर गाढे, प्रा .मनोहर तायडे, प्रा.उमेश पाटील,डॉ.संतोष गव्हाड, डॉ.जी.आर. ढेंबरे, प्रा.गोविंद सावळे, श्री.सुनील मेढे आदी ने परिश्रम घेतले.



