रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन आपल्या समर्थकांसह मातोश्री येथे जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे रावेर परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाचा (Prahar Janshakti Party) धक्का मानला जात आहे.[ads id="ads1"]
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे (Shivsena Chief Uddhav Balasaheb Thackeray) यांच्याहस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जळगाव जिल्हाध्यक्ष (Jalgaon District President) अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष तथा रावेर (Raver) नगरीचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र रामदास महाजन याचा जाहीर प्रवेश मुंबई (Mumbai येथे करण्यात आला. [ads id="ads2"]
सोबत प्रहारचे रावेर तालुक्यातील उपतालुका प्रमुख भगवान कोळी, प्रहारचे रावेर उपशहरप्रमुख शेख लतीफ यांनी प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जळगाव (Jalgaon) जिल्हाप्रमुख दिपकभाऊ राजपुत, शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन महाजन, उपविभाग प्रमुख स्वप्नील गिरडे, तुषार निंबाळकर आदी उपस्थिती होती.