साळवे ता.धरणगाव येथील इंग्रजी विद्यालयात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासो गोपीचंद पाटील (उपाध्यक्ष) हे होते त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून १२ मार्च १९५१ पासून इतिहास सांगताना म्हटले की गावातील समाजसेवकांनी पंचक्रोशीतील ग्रामीण भागात इंग्रजी शिकण्याची सोय व्हावी म्हणून ग्राम सुधारणा मंडळाची स्थापना केली व साळवे इंग्रजी विद्यालय ही छोटीशी शाळा सुरू करून आज तिचे वटवृक्षात रूपांतर झालेले पाहून खरी समाजसेवा ठरली असे म्हणाले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात मुख्याध्यापक ए एस पाटील म्हणाले की संस्थापक अध्यक्ष कै. देवराम भाऊ नारखेडे यांनी गांधीजींच्या दांडी यात्रेच्या प्रारंभाची तारीख १२ मार्च मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली, त्याप्रमाणे १२ मार्च १९५१ ला ग्राम सुधारणा मंडळाची स्थापना करून ऐतिहासिक घटनेच्या स्मरणात इंग्रजी विद्यालय सुरू करून परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची गंगोत्री साळव्यात आणून ज्ञानदानाचे महानकार्य केले आहे असे सांगितले.[ads id="ads2"]
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत सेमी इंग्रजी चे वर्ग व किमान कौशल्या चे शिक्षण सुरु आहे. जेष्ठ शिक्षक जी व्ही नारखेडे यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्वतःला ज्ञानपिपासू बनवावे.याप्रसंगी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संचालक मंडळाने स्नेहभोजन घेतले. संस्थेचे चेअरमन डॉ. गिरीष नारखेडे, खजिनदार डॉ. चंद्रकांत नारखेडे, सदस्य सुभाष बोरोले व लीलाधर ब-हाटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी मोरे सर व आभार प्रदर्शन सौ नीता पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ए वाय शिंगाणे, एस व्ही राठोड, बी आर बोरोले, गुणवंती पाटील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.