विवरा-वडगाव रस्त्यावर अपघाती व्यक्तींसाठी ''पोलीसदादा'' ठरले देवदुत

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  पोलिसांच्या मदत कार्याने मोठा अनर्थ टळला ..

विवरे ता.रावेर (समाधान  गाढे) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द ते वडगाव दरम्यान आशा पारीक नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलाजवळ रावेर वरून येणारा मोटर सायकल स्वार हे सावदा कडे जात असताना, टू व्हीलरमोटरसायकल चैनव्हील ला कव्हर नसल्यामुळे   मोटर सायकल स्वार च्या मागे बसलेल्या स्त्रीचा बुरखा हा चेन मध्ये अडकल्याने गाडी स्लीप झाली व चालकासहित स्त्री ला किरकोळ मार लागला आहे.[ads id="ads1"]  

  त्याच दरम्यान जळगाव वरून रावेर कडे जात असणारी जळगाव पोलीस दंगा नियंत्रण पथक गाडी   चालक यांचे लक्ष त्या मोटरसायकल स्वारकडे गेले असता व त्या स्त्रीचा बुर्का हा चैन व्हील मध्ये अडकलेला बघुन  लगेच पोलीस पथक त्यांनी या ठिकाणी  गाडी थांबवून अपघाती समय त्या व्यक्तींना  मदत केली व जखमी व्यक्तीचा चैन मध्ये बुरखा अडकल्यामुळे हा प्रकार घडला आहे.  चैन व्हील मधून हा बुरखा काढुन  चालक व स्त्री यांना किरकोळ जखम लागलेली आहे.[ads id="ads2"]  

   पोलिसांनी  जखमी व्यक्तींना रावेर कडे दवाखान्यात उपचारासाठी पाठवले व या ठिकाणी उपस्थित असलेले व्यक्तींनी पोलिसांची कामगिरीबद्दल अभिनंदन केले व त्यांचे कौतुक देखील केले अपघाती व्यक्तींनीसुद्धा  पोलिसांचे आभार मानले.  जो व्यक्ती एक हात मदतीचा  दाखवतो तो व्यक्ती खरच त्या व्यक्तीसाठी एक देवाचे रूप म्हणून देवदूत असतो असे "साप्ताहिक सुवर्ण दिप"शी अपघाती व्यक्तींनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

>>>हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त

>> हेही वाचा : सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू

>>>हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

>>>हेही वाचा :- ग्रामपंचायतीच्या विहिरीचे‎ खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात‎ निसटल्याने विहिरीत पडून मृत्यू 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!