यावल (सुरेश पाटील)
बुधवार दि.8 मार्च 2023 रोजी यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करणयात आला.याप्रसंगी शाळेचे प्रा.श्रीमती रंजना महाजन यांच्या हस्ते गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात केली.[ads id="ads1"]
शाळेतील इयत्ता 9 वी मधील कुमारी.चिन्मयी महाजन,ध्रुवीका पाटील व कुमार.दुर्वेश महाजन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विध्यार्थ्यांना महिलांना महिलांच्या जिवनाविषयी माहिती दिली.तसेच शाळेत कार्यरत असलेल्या सर्व महिला शिक्षकांचा व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांचा फुलगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कुमारी कृपा धांडे व कुमारी पुर्विका पाटील यांनी केले व आभार कुमार ऋषिकेश बारी यांनी केले.यावेळी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


