यावल (सुरेश पाटील)
आज दि.6 रोजी होळी निमित्त सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कार्यक्रम होळीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सर्वात प्रथम शाळेत होळीची सजावट करण्यात आली सौ.तिलोत्तमा महाजन मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व समजावून सांगतले.तद्नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम व सर्व शिक्षकवृंद व विदयार्थी तसेच कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत सौ.प्रविणा पाचपांडे मॅडम यांनी मैदानावर होळीची पूजा केली व होळी पेटवण्यात आली.[ads id="ads1"]
सर्व विद्यार्थी अत्यंत उत्साहित व आनंदित होते . तसेच सर्व विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करीत आजचा होळीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा केला.संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशांत फेगडे सह सर्व शिक्षक वर्गाचे व कर्मचारी वर्गाचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले.अशा प्रकारे आजचा होळीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला .