यावल (सुरेश पाटील)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्या प्रकरणी आमदार राजू मामा भोळे तसेच भाजपा जिल्हा कार्यकारणी यांच्या आदेशानुसार यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे यावल येथे टी पॉइंट वर आज सकाळी 11 वाजता राहुल गांधी यांच्या बाबत संतप्त भावना व्यक्त करून त्यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध करून आंदोलन करण्यात आले.
शनिवार दि.25 रोजी सकाळी 11वाजता आंदोलनात यावल तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेस काळे फासून जोडे मारो आंदोलन करीत संतप्त भावना व्यक्त केल्या.
आंदोलनात डॉ.कुंदन फेगडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेंगडे,तालुका सरचिटणीस विलास चौधरी,
उज्जैनसिग राजपूत,लहू पाटील,डॉ.निलेश गडे व्यंकटेश बारी,पिंटू चौधरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.