आर.पी.आय शाखा फलकाचे उद्घाटन व पक्ष प्रवेश
यावल तालुका प्रतिनिधी (फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील वड्री या गावापासून तीन कि. मी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी आसारबारी धरण येथे ३० ते ३५ वर्षापासून वास्तव्यास असलेले आदिवासी बांधव यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष राजु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केला असून त्या ठिकाणी शाखा फलकाचे अनावरण आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले असून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले सर्व आदिवासी बांधवांनी जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्याकडे दोन दिवस आधी सर्व्हे करून मागणी केली होती.[ads id="ads1"]
आम्ही या सातपुड्याच्या पायथ्याशी 30 ते 35 वर्षापासून रहिवास करत असून आम्हाला या ठिकाणी भोंगऱ्या बाजार भरवायचा आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी यांनी वड्री गावातील सरपंच अजय भालेराव ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व अन्य कार्यकर्त्यांसोबत भोंगऱ्या बाजारा संदर्भात चर्चा करून वड्री येथील सरपंच अजय भालेराव व यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांनी योग्य ते कागदपत्रे जमा करून योग्य ती परवानगी घेत आज त्या ठिकाणी भोगर्या बाजार भरवण्यात आला असून सर्व आदिवासी बांधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष राजु सूर्यवंशी तालुका अध्यक्ष विष्णू पारदे व वडरी येथील सरपंच अजय भालेराव यांचे मनापासून स्वागत केले.[ads id="ads2"]
या भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी वड्री येथील सरपंच तालुका अध्यक्ष विष्णू पारदे यांच्या हस्ते नारळ फोडून भोंगऱ्या बाजाराला सुरुवात केली यावल पासून १० कि मी आसरबरी असलेले आदिवासी पाड्यावर भोगऱ्या बाजाराचे चित्र पाहावयास मिळाले असून या आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावेनासा झाल्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांना आदिवासी बांधवांचा पेरावा व तीर कमान देऊन स्वागत करण्यात आले या आदिवासींच्या गावात भोंगऱ्या बाजाराने आदिवासीं बांधवांमध्ये नवचैतन्य दिसत होते मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील पाड्यांमधील आदिवासींची या बाजारांकडे धाव घेत भोंगर्या बाजाराच्या आनंद घेतला तसेच होळी सणा रोजी होणार याची सांगता वड्री धरण आसारबारी येथे आज रोजी प्रथमच आदिवासी पावरा समाजाने भोगर्या बाजाराचे आयोजन केले होते या पहिल्याच वर्षातला आदिवासी पावरा समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या पारंपारिक पद्धतीत वेशभूषा करीत नाच गाण्यांनी हा बाजार उत्साहात व रंगत भरून पार पाडला पारंपारिक पद्धतीने नुसार आदिवासी पावरा समाजात होळीच्या एक आठवडा पहिले या बाजारांना सुरुवात केली जाते.
>>>हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त
>> हेही वाचा : सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू
>>>हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
>>>हेही वाचा :- ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात निसटल्याने विहिरीत पडून मृत्यू
बाजारात पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करीत महिला व पुरुष अबालवृद्ध नाच गाणे करीत आपला उत्साह पार पाडत असतात होळी सणा रोजी गोड पदार्थ करून याची सांगता केली जाते त्यानंतरच इंद्र देवाची पूजा काही दिवसांनी केली जाते त्यानुसार येथे हा सण व हा बाजार साजरा करण्यात आला बाजाराला सर्व स्तरातील समाज बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला बंदोबस्तासाठी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी होमगार्डआजूबाजूच्या गावातील सरपंच आरपीआय कार्यकर्ते आदिवासी बांधव आदींनी ठाण मांडून तेथे निरीक्षण केले.
या भोंगऱ्या बाजाराला आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी सेवानिवृत्ती सैनिक जिल्हाध्यक्ष सुनील तायडे यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारदे बाबूलाल पटेल युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे उपाध्यक्ष विक्रम प्रधान. जिल्हासचिव सुपडू संदानशिव.
संघटक डॉली वानखेडे राजू इंगळे राजू वानखेडे शिवाजी गजरे किरण तायडे प्रवीण सावळे सातपुडा पायथ्याशी असलेले संपूर्ण आरपीआयचे आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.