ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू झालेली बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करावी ; अशोक सब्बन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या पाठपुराव्याला यश

यावल (सुरेश पाटील)

ग्रामसेवक गावातच, ग्रामपंचायत मध्येच कामकाजाच्या कार्यकाळात भेटणार ‘बायोमेट्रिक हजेरी ग्रामविकास विभागाचा 5 जानेवारीच्या निर्णयाची अंम्मलबजाणी करा अधिकाऱ्यांना पत्र 

गावात ग्रामपंचायतीशी निगडित कामासाठी, ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची,  मोबाईलफोन वर संपर्क साधण्याची गरज किंवा पंचायत समिती कार्यलयात चक्कर,हेलपाटे मारण्याची  आवश्यकता गरजवंत नागरिकांना आगामी काळात पडणार नाही. [ads id="ads1"]  

    ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये रोज कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय 5 जानेवारीला ग्रामविकास विभागाने घेतला आहे. [ads id="ads2"]  

  याबाबत आदरणीय अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाने या करीता सतत शासनाकडे पाठपुरावा केला.तसा आदेश हि ग्रामविकास कार्यलया कडून काढण्यात आला पण आद्याप त्याची अंम्मलबजावणी झालेली नाही त्या करीता आगामी होणाऱ्या ग्रामसभेत तसे ठराव करावे असे अवाहन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे सरचिटणीस अशोक सब्बन व जिल्हा अध्यक्ष सुधिर भद्रे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यानी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!