रावेर तालुक्यातील ‘त्या’ ग्रामसेवकाची पुरस्कारासाठीची निवड अखेर रद्द

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) बनावट अपंगत्व प्रकरणी गुन्हा दाखल असतांनाही आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी (Gramsevak Award) निवड करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव अखेर वगळण्यात आले आहे.

आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी  (Gramsevak Award)प्राप्त ठरवलेले रावेर तालुक्यातील (Raver Taluka)  ग्रामसेवक रविंद्रकुमार चौधरी यांना निवड यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांच्यावर बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतल्यामुळे गुन्हा दाखल आहे. यामुळे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामसेवकाची निवड रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर (Jalgaon Zilha Parishad) आली आहे.[ads id="ads1"]  

आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी रवींद्रकुमार चौधरी यांची शिफारस रावेर पंचायत समितीने (Raver Panchayat Samiti)  केली होती. मात्र ग्रामसेवक चौधरी यांच्या विरुध्द बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीसाठी लाभ घेतल्याबाबत रावेर येथील पोलिस ठाण्यात (Raver Police Station) गुन्हा दाखल आहे. [ads id="ads2"]  

  जिल्हा परिषदेचे(Jalgaon Zilha Parishad) उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी याबाबतचा अहवाल तातडीने रावेर पंचायत समितीकडून (Raver Panchayat Samiti) मागवला होता. प्राप्त अहवालानुसार पात्र ठरविण्यात आलेले ग्रामसेवक चौधरी यांची आदर्श पुरस्कारासाठी झालेली निवड स्थगित करण्यात आली आहे. यामुळे संपुर्ण रावेर तालुक्यासह परिसरात  चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!