ऐनपूर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (विनोद हरी कोळी) सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील विद्यार्थी विकास विभाग, मानसशास्त्र विभाग, समान संधी केंद्र व इतिहास विभागा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रेखा पी. पाटील यांनी बाबासाहेब हे महान व्यक्तिमत्व आहे की, ज्यांनी सर्व मानव जातींना गुलामगिरीतून मुक्त केले. [ads id="ads1"]  

  व्याख्यानाचे प्रमुख वक्ते प्रा. नरेंद्र मुळे इंग्रजी विभाग यांनी बाबासाहेबांनी महिलांना गुलामगिरीतून  मुक्त केलेअसे सांगितले.  तसेच प्रा. प्रदीप तायडे यांनी बाबासाहेबांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.प्रा. एम के सोनवणे यांनी अस्पृश्यांना होणाऱ्या त्रासातून बाबासाहेबांनी मुक्त केले.असे सांगितले.तसेच प्रा. एस. पी. उमारीवाड यांनी भारतातील तीन महात्मे एक संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांना मी कधीही विसरणार नाही असे त्यांच्या मनोगतात सांगितले. तसेच एका विद्यार्थिनीने व एका विद्यार्थ्याने त्यांचे मनोगत व्यक्त केले. [ads id="ads2"]  

  या कार्यक्रमात जयंतीचे आयोजन, सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी सामाजिक लोकशाही  ही तीन तत्वा शिवाय बनू शकत नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन तत्त्व व्यक्तीचा विकास त्याच बरोबर देशाचा विकास  करण्यामध्ये सुद्धा हातभार लावत असतात असे त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. या कार्यक्रमाला 89 विद्यार्थी प्राध्यापक व  प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. अक्षय महाजन यांनी मानले व अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!