ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती उत्सवानिमित्त मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे की ऐनपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले ऐनपुर बस स्टॅण्ड परीसरात मंडप टाकून तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नितीन भागवत अवसरमल यांच्या कडून भारतीय राज्यघटना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले व बस स्टॅण्ड परीसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मोटर सायकल रॅली मध्ये १०० ते १५० मोटर सायकल चालक यानी रॅली मध्ये भाग घेतला या मोटार सायकल रॅली ला निभोरा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश धुमाळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील,ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीराम पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष अमोल अवसरमल यांच्या हस्ते झेडा दाखऊन रॅली ला सुरवात करण्यात आली रॅली संपुर्ण गावात फिरवून ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads2"]
या ठिकाणी सरपंच अमोल महाजन यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले ग्राम पंचायत सदस्य किशोर पाटील यांनी दिप धुप प्रज्वलित केले यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्य केंद्रीय शिक्षक विजय एस अवसरमल यांनी सर्व उपस्थितांना त्रिसरन व पंचशील दिले नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर निशा विजय अवसरमल या विद्यार्थिनीने व माजी सरपंच विकास अवसरमल यांनी आपले विचार व्यक्त केले यानंतर ऐनपुर येथील ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले तसेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या कडून बस स्थानक परिसरात पोहे व दुधाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला अबाल वृध्द तरुण तरुणी व गावातील सन्माननीय नागरीक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती च्या कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



