जांभोरे येथे गुरु - शिष्य जयंती निमित्त प्रबोधन पर व्याख्यान !.....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली - कैलास पवार

धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर                     

धरणगांव - भारतीय संविधानाने पारंपारिक राजेशाही   व राज्यपद्धती समूळ नष्ट केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या पायावर उभी राहणारी लोक तांत्रिक आधुनिक गणराज्यची स्थापना संविधान निर्मितीमुळे भारतात प्रथमच झाली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, व राष्ट्रनिष्ठा यांच्या आधारावर भारतीय संघराज्याची निर्मिती करण्यात आली.[ads id="ads1"] 

              नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करून माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद 'संविधानाच्या माध्यमातून' बाबासाहेबांनी दिली. असल्याचे प्रखर विचार जि प पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक कैलास पवार यांनी व्यक्त केले. जांभोरे येथे महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित प्रबाेधन पर व्याख्यानात ते बोलत होते. [ads id="ads2"] 

            सुरुवातीला सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या अंकिता अहिरे व हर्षदा सपकाळे  यांचा तर उत्कृष्ट  सूत्रसंचालन करणाऱ्या राजेश अहिरे यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंत गुजर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच किशोर बोरसे, महादू अहिरे, ग्रामसेवक पाटील आप्पा,पाे. पाटील जितेंद्र अहिरे, पवन बिसेन उपस्थित होते. कार्यक्रमास बापू सपकाळे,  सुभाष निकम, महेंद्र सपकाळे ,पुंडलिक सपकाळे, अशोक अहिरे ,धनराज निकम, हिम्मत सोनवणे, गणेश सपकाळे, रामजी सपकाळे, अमोल सपकाळे ,संजय सपकाळे, रमेश सपकाळे, सुरेश अहिरे, सुरेश पाटील ,शुभम चव्हाण, सागर गुजर, रामदास गुजर,   यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेश अहिरे यांनी केले आभार विशाल अहिरे यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!