नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरावर भीषण पाणीटंचाईची सावट; पालखेड धरणातून आवर्तन वेळेत उठले नाही तर मनमाडला पाणी पाणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल ) :- नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाटला असून जेमतेम महिनाभर पुरेल येवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मनमाड शहराला पाणी पाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मनमाड शहराला पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. [ads id="ads1"] 

  मात्र जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात 20 ते 25 दिवसात पाणीपुरवठा करण्याची वेळ मनमाड पालिका व शासनावर येऊ शकते. मनमाड शहरातील वाघदर्डी व पालिकेच्या मालकीचा पाटोदा साठवणूक तलावात महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा आहे ‌ पालखेड धरणाच्या आवर्तनावर आता पुढची सगळी परिस्थिती अवलंबून असल्याचे मनमाड नगर पालिका अधिकारी अमृत कांबळे यांनी सांगितले आहे.[ads id="ads2"] 

        पाणीटंचाई आणि मनमाड हे नातं अगदी जिव्हाळ्याचं असून एकेकाळी तब्बल 52 दिवसा आड पाणीपुरवठा होऊनही मनमाडकर शांतच होते. मनमाड करांच्या सहनशीलतेबद्दल तर विचारता सोय नाही. आजही मनमाड शहराला पंधरा दिवसांनी (फक्त कागदपत्र)  कागदोपत्री पाणीपुरवठा केला जातो. प्रत्यक्षात मात्र आजही 19 ते 20 दिवसांनी मनमाड करांना पाणी मिळते. आज सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी वागदर्डी धरणाने तळ घातला असून जेमतेम महिनाभर पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. तर भविष्यात पालखेड डाव्या कालव्याद्वारे आवर्तनाने होणारा पाणीपुरवठा जर वेळ झाला नाही तर हाच पाणीपुरवठा 25 दिवसावर जाईल. यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. याबाबत मनमाड नगरपालिकेच्या वतीने पाटबंधारे विभागाला वेळेत पाणीपुरवठा करण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची मनमाड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी अमृत काजवे यांनी सांगितले असून शासनाने देखील आहे तो पाणीपुरवठा 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पुरवण्यात यावा असे आदेश आदेश दिले असल्याने भविष्यात पालखेड आवर्तनावरच मनमाड शहराला पाणीपुरवठा करावा लागेल असेही अमृत काजवे यांनी सांगितले.

........................................

मनमाड शहराला गेल्या चाळीस वर्षापेक्षा जास्त काळापासून पाणीटंचाई आहे. पाणी येईल त्या दिवशी कोणत्याही सुखदुःख कार्यक्रमाला जाता येत नाही. पाणी येणार असले त्या दिवशी घरीच थांबावे लागते. कारण पाणी येण्याची वेळ निश्चित नसते. त्यात पाणी येऊन गेले तर पुन्हा पंधरा ते वीस दिवस पाणी मिळणार नाही यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ येते. त्यामुळे पाणी येणार त्या दिवशी सर्व कामधंदे सोडून पाणीच भरावे लागते

     गृहिणी मंदा साबळे

......................................

मनमाड शहराला पालखी धरणातून आवर्तनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी हे पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात. यामुळे देखील पाणी मिळण्यास उशीर होतो. व मनमाड शहरातील जनतेला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भविष्यात पालखेड धरणातून मिळणाऱ्या अवर्तनावर मनमाड शहराचा पाणी प्रश्न अवलंबून आहे. आम्ही वेळेत पाणी देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. जनतेला जास्त त्रास होऊ नये यासाठी उपाय योजना करत आहोत.

       पाणीपुरवठा अधिकारी मनमाड नगरपरिषद - अमृत काजवे

..............................

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!