नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र सरकारने शिधा देण्याचा निर्णय घेतला असून दिनांक सहा जुलै 2023 रोजी गुरुवारी नांदगाव शहरात 100 रुपयांचा आनंदाचा शिदा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.[ads id="ads1"]
गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी नांदगाव येथे आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो पाम तेल आशा चार वस्तूंचा संच देण्यात येत आहे.[ads id="ads2"]
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, चेतन पाटील, कपिल तेलोरे, राजाभाऊ अहिरे, गणेश सरग, अरविंद पारखे, गणेश पाटील, दत्तात्रय भावसार, नितीन पैठणकर, मनोज वाघ, मुन्ना शर्मा आदी उपस्थित होते.