प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांचेकडून पंचायत समिती रावेर येथे स्मरणपत्र देऊन निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी

 प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाने तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने दिनांक  03/04/2023 या रोजी पंचायत समिती रावेर येथे रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधव यांच्या हक्काच्या 5% टक्के निधीबाबत निवेदन BDO मैडम रजेवर असल्यामुळे तेथील सहाय्यक अधिकारी यांना देण्यात आले.[ads id="ads1"]  

  मागील निवेदन दिनांक 5 सप्टेंबर 2022 या रोजी BDO मॅडम यांना देण्यात आले होते. परंतु रावेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना BDO मॅडम यांनी वेळोवेळी उडवा उडवी चे उत्तर दिले परंतु रावेर तालुक्यात 80ते 90% ग्रामसेवकांनी निधी उपलब्ध करून दिला नाही.[ads id="ads2"]  

    BDO मॅडम यांनी दिव्यांग बांधवांना आश्वासन दिले होते की एका महिन्यात सर्वांना पाच टक्के निधी मिळवून देऊ पण तसं काही झालं नाही.BDO मॅडम यांचा कामात हलगर्जीपणा च कामचुकारपणा मुळे रावेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांध5%.व  टक्के निधी पासून वंचित राहिले.

  याला जबाबदार पंचायत समिती मधील संबंधित ग्रामसेवक अधिकारी व BDO  मॅडम आहेत यात शंकाच नाही.या अनुषंगाने पंचायत समिती मधे सहाय्यक प्रशासक यांना स्मरण पत्र प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुक्याच्या  वतीने देण्यात आले.तसेच येणारया 10 दिवसाच्या आत रावेर तालुक्यातील राहिलेल्या सर्व  दिव्यांग बांधवांना 5%निधी आणि 2016 च्या G. R नुसार मिळाला नाही तर  पंचायत समितीच्या आवारात उपोषणाचा इशारा प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने देण्यात आला.तसेच दिव्यांग बांधवांची निवेदन फाईल  कामचुकार पणा मुळे सहा महिन्यापासू प्रलंबित ठेवल्यामुळे संबंधीत अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही हौऊ शकेल असाही इशारा यावेळी प्रहार दिव्यांग संघटना  यांनी दिला.

त्या ठिकाणी उपस्थीत,दिनेश सैमिरे  प्रहार दिव्यांग क्रांती संघटना उपजिल्हाध्यक्ष,प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष,विनोद कोळी. दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, दिव्यांग तालुका उपाध्यक्ष जितेंद्र कोळी, दिव्यांग तालुका संघटक आनंदा कोळी, दिव्यांग तालुका संपर्कप्रमुख शेख मोहसीन ,सुलवाडी शाखा तालुका उपाध्यक्ष प्रमोद महाजन, दिव्यांग शेख मुख्तार ,इत्यादी प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!