रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक उद्या दि.1. मे रोजी दुपारी 11. वाजता नवीन रेस्ट हाऊस सावदा रोड रावेर येथे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.[ads id="ads1"]
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेल, जिल्हा महासचिव शेख याकूब शेख नजीर हे मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीला श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम व सामाजिक सप्ताह साजरा करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे.[ads id="ads2"]
तरी रावेर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव विविध क्षेत्रातील काम करणारे पदाधिकारी यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन रावेर तालुका महासचिव कांतीलाल गाढे, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे,, सचिव ज्ञानेश्वर तायडे, अर्जुन वाघ, राजेंद्र अवसरमल, कंदरसिंग बारेल, शंकर मशाने, सलीम शहा, इमरान शेख, विनोद तायडे, अब्बास भाई, रतन भालेराव,, बबलू भाई, सलमान शहा, दौलत अडांगळे, अशोक शिरतुरे, गौतम अटकळे, इत्यादींनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आव्हान केले आहे.


