बहिणीच्या स्मरणार्थ रेंभोटा गावाला खुर्ची दान ; गाढे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

बहिणीच्या स्मरणार्थ रेंभोटा गावाला खुर्ची दान ; गाढे परिवाराचा स्तुत्य उपक्रम


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) गेल्या दोन वर्षापुर्वी कोरोना काळात प्रणिता अरुण गाढे यांचा दुदैवी मृत्यू झाला नुकतेच लग्न होवून सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतांना प्रणिताला कोरोनाची लागन झाली. खुप प्रयत्न करूनही उपचार करूनही ती वाचली नाही. गाढे परिवाराची लाडाची प्रणिताचे दुदैवाने निधन झाले. [ads id="ads1"]  

  तीची आठवण कायम स्मरणात रहावी व गावासाठी काहीतरी देणे लाभावे यासाठी तीच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात रेंभोटा (Rembhota Taluka Raver) गावासाठी सरपंच उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये गावाला विस खुर्ची दान करण्यात आल्या. प्रणिताचा भाऊ प्रजित अरुण गाढे यांनी दान दिले. [ads id="ads2"]  

  रेंभोटा(Rembhota Taluka Raver)  येथील सरपंच पती आनंद सपकाळे, उप सरपंच पती सुनिल महाजन, माजी सरपंच सुरेश शिवराम पाटील,विजय पाटील, प्रविण धुंदले,दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, प्रजीत अरुण गाढे,प्रतीक समाधान गाढे, प्रशिक समाधान गाढे,लता समाधान गाढे,प्रज्योत कांतीलाल गाढे. राहुल गाढे,अभियंता ज्ञानेश्वर गाढे. संजय गाढे, छोटु गाढे, संदेश गाढे, व संपूर्ण गाढे परीवार उपस्थीत होते. गाढे परिवाराने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!