"मुस्लिम बांधवांनी केले जयंती उत्सव समितीचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार"
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- अस्पृश्यतेच्या अग्निकुंडामध्ये होरपळत असलेल्या समाजाला "शिका संघटित व्हा संघर्ष करा"असे मंत्र देणारे देशातील शोषित घटकांचे मुक्तीदाते,सामाजिक अनैतिकतेचे बालेकिल्ले उध्वस्त करून,देश आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दर वर्षी १४ एप्रिल रोजी संपूर्ण जगात जयंती साजरी केली जाते.[ads id="ads1"]
यामुळे आंबेडकरी समाजाच्या नसानसांमध्ये चैतन्यची लहर उसळते.या निमित्ताने रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे आज दि.१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३२ वी जयंती आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्यां महिला पुरुष सह तरुणांनी मोठ्या धुमधडाक्यात वाजत-गाजत अतिशय विराट मिरवणुक काढून साजरी केली.यादरम्यान चॉंदनी चौकात आत्माराम तायडे सर,गजू लोखंडे सर,रमाकांत तायडे,सचिन लोखंडे,प्रदिप तायडे,संजय लोखंडे,स्वप्नील तायडे योगेश पुर्भी,या सर्व जयंती उत्सव समितीचे पदाधिकाऱ्यांचा शेख फरीद शेख नुरोद्दीन,युसूफ शाह सुपडू शाह,रशीद बिस्मिल्ला बागवान,शेख इरफान शेख इक्बाल,शेख निसार अहमद,सह मुस्लिम बांधवांनी पुष्पमाला देवून सत्कार करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.[ads id="ads2"]
यावेळी सावदा पो.स्टे.ला रूजू झाले पासून जातीने लक्ष घालून योग्य रित्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील व कर्तव्यदक्ष सहा.पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.सदरील मिरवणुकीच्या प्रसंगी रावेर तहसीलदार बंडू कापसे,सावदा मंडळ अधिकारी प्रविण वानखेडे,तलाठी शरद पाटील सुध्दा उपस्थित होते.तसेच जयंतीदिनी दिवसभर बस स्थानक परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्षांचे आणि समाजीक संस्थाचे मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सावदा पोलिस स्टाप सह गृहरक्षक दलाचे जवानांनी ठीक ठिकाणी चूक बंदोबस्त ठेवले होते.