यावल (सुरेश पाटील) यावल कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुक्यात आज दि. 28 रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यात एकूण तीन ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे.यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय मतदान केंद्रावर सोसायटी मतदार संघातील उमेदवार तथा जिल्हा परिषद गटनेता तथा यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्यात आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक उडाली यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी सुद्धा उपस्थित होते.[ads id="ads1"]
उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे एका पोलिसाला मतदान केंद्राच्या बाहेर आणि आवारात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे कामी आणि गर्दी करू नये म्हणून बोलले असता त्या एका पोलिसांने आणि संबंधित एका पीएसआयने वस्तुस्थिती समजून न घेतल्याने दोघांमध्ये व उपस्थित लोकप्रतिनिधीमध्ये शाब्दिक चकमक उडाली यावेळी आमदार शिरीषदादा चौधरी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी उपस्थितांना शांततेत राहण्याचे आवाहन केले.[ads id="ads2"]
यावल येथील मतदान केंद्रावर बाजार समिती निवडणूक रिंगणातील उमेदवार त्यांचे समर्थक, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. याचप्रमाणे तालुक्यात साकळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा फैजपूर येथील मुनिसिपल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज सकाळी आठ वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती आणि आहे मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला मतदान प्रक्रिया बारा वाजेपर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत सुरू होती.
हेही वाचा:- आमदार चंद्रकांत पाटील यांचे आमदार एकनाथ खडसेंना थेट आव्हान, म्हणाले......
हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना



