मरीमातेवर श्रद्धा ठेवून 10 वर्षाच्या मुलाने ओढल्या बारा गाड्या : भालोद गावात सकारात्मक दृष्टीने चर्चा आणि कौतुक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

मरीमातेवर श्रद्धा ठेवून 10 वर्षाच्या मुलाने ओढल्या बारा गाड्या  भालोद गावात सकारात्मक दृष्टीने चर्चा आणि कौतुक

यावल (सुरेश पाटील)

शनिवार दि. 22 एप्रिल 2023 रोजी मरीमातेवर श्रद्धा ठेवून 10 वर्षाच्या बालकाने ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने मरी मातेच्या 12 गाड्या यशस्वीपणे ओढल्या.यामुळे यावल तालुक्यातील भालोद पंचक्रोशीत सकारात्मक दृष्टीने चर्चा आणि कौतुक होत आहे.[ads id="ads1"] 

भालोद ता.यावल येथील श्री मरीमाता यात्रा ( दि.22 रोजी) व श्री खंडेराव महाराज यात्रा (दि.23 रोजी) उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडला,गेल्या 40 वर्षाच्या काळात एक नवीन इतिहास म्हणजे केवळ 10 वर्षे वय असलेल्या व इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा बालक भगत रणवीर राजू कोळी या बालकाने श्रीमरी माता मंदिरा जवळील 12 गाड्या ओढल्या,कोळी कुटुंबीयांना सुतुक असल्याने कोळी पंचमंडळीने हा निर्णय घेतला संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एवढ्या बाल वयातील बालकाने बारा गाड्या ओढल्याने परिसरातील नागरिकांनी व गावातील नागरिकांनी या ठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.[ads id="ads2"] 

   तसेच खंडेराव महाराज मंदिराजवळील बारा गाड्या सचिन निळकंठ कोळी या युवकाने ओढल्या या प्रसंगी सरपंच प्रदीप श्रीराम कोळी, मधुकर दोधू कोळी,रामा भागवत कोळी,सुधाकर सदू कोळी,रामकृष्ण सदू कोळी,पंढरी भागवत कोळी, माधव राजाराम कोळी, निलेश पंढरी कोळी,पितांबर कुंभार,शंकर बूधो भोई, मोहन झांबरे,योगेश नेमाडे,ललित झांबरे,हूना चोपडे,पिंटू चौधरी,धनराज झोपे,जितेंद्र रघुनाथ कोळी सुनील मधुकर कोळी दीपक श्रीराम कोळी चेतन माधव कोळी अदि सह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित होते. याप्रसंगी फैजपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!