दीपनगर ता.भुसावळ(सुमित निकम) - दिपनगर महामार्गावरील साकरी फाट्याच्या उड्डाण पुला लगत १४ एप्रील रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तिघांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जख्मी झाले होते .त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना अक्षय सोनवणे याचा आज अखेर मृत्यु झाला.या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads1"]
दि.१४ एप्रील भुसावळ शहरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष सुरु असतांना भुसावळ पासुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या साकरी फाट्याजवळ अक्षय सोनवणे, मंगेश काळे वरणगांवकडे येत असतांना रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या त्रिकुटांनी वाद घालून त्यांना चारचाकी वाहनातून बाहेर काढीत मंगेश काळे व अक्षय सोनवणे यांच्यावर गोळीबार करून जख्मी केले होते. [ads id="ads2"]
याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले .मात्र,९ दिवस मृत्युशी झुंज देत असलेल्या अक्षयचा आज ( दि.२२ ) सकाळी ९ वाजे दरम्यान रुग्णालयात मृत्यु झाला . तर या घटनेतील हल्लेखोर त्रिकुटाला पोलीसांनी तिन दिवसातच अटक केली असून त्यांना न्यायालयाने आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .
हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना
तर या घटनेचा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे तसेच पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे सहकाऱ्यांसह तपास करीत आहेत . तर किरकोळ वादातून हल्लेखोरांची थेट गोळीबारांपर्यंत मजल गेल्याने भुसावळ व परिसरात खळबळ उडाली आहे



