नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- आपला भारत देश भांडवलदाराच्या, सत्ताधीशांच्या मुखीत असून सामान्य कष्टकऱ्यांचे शोषण सुरू आहे. वंचित समाज आणि मजूर होरपळून निघाला आहे. अशा वेळी या लोकांना ओळखून समाजाने वागायचे आहे. समाजाला बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांची गरज आहे. बाबासाहेब येणार आहेत परंतु ते पुतळ्यातून येणार नाहीत किंवा पुन्हा जन्म घेणार नाहीत तर ते इथल्या तरुणांच्या चळवळीतून येणार असल्याचे परिवर्तनाचे विचार आपल्या शाहिरी जनशातून पहाडी आवाजामध्ये लोकशाहीर संभाजी भगत यांनी मनमाड येथे भीमोत्सवाच्या वेळी. बोलताना आपले मत व्यक्त केले. सर्वात महामानवाच्या संदर्भात होत असलेले वैचारिक प्रदूषण दूर होणे, तसेच संकुचित वृत्ती आणि जाती-धर्मांची कुंपणे तोडून महापुरुषांच्या विचारांना व्यापक स्वरूप घेण्याची गरज लोकशाहीर संभाजी भगत यांनी आपल्या पहाडी आवाजात शहरी जलशातून विशद केली.[ads id="ads1"]
नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती पासून सुरु झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भीमोत्सवाची सांगता दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी बुधवारी लोकशाहीर संभाजी भगत यांच्या ऑस्करला धडकलेल्या आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलशाच्या सादरीकरणाने झाली. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भीम उत्सव आयोजन समितीचे आयोजक अमोल खरे यांच्या हस्ते मशाल प्रयोजित करून आणण्यात आली. सर्वच महामानवांच्या संदर्भात होत असलेले वैचारिक प्रदूषण दूर होणे गरजेचे आहे. संकुचित वृत्तीची अडचण आणि जाती व धर्मांची कंपनी लावण्यात आल्याने महामानवाच्या विचारांना पाहीत असे व्यापक स्वरूप येऊ शकले नाही. त्यामुळे कंपनी तोडून महापुरुषांच्या विचारांना व्यापक स्वरूप देण्याचे काम करण्याची गरज आहे. या जाणिवेतून शाहिरीतून प्रबोधन कार्य करीत असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले. आपल्या पहाडी आवाजामध्ये आंबेडकरी चळवळीतील महिलांचे योगदान विशद करताना माझा भीम मले सांगतो काही. मले भेटतो बाई! असे गीत सादर केले. महिलांवरील होणारे अन्याय आणि अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर घ्या कळ्यांची काळजी, आले आले गारदी! असे प्रेरणादायी गीतही शाहीर भगत यांनी सादर केले. खास आग्रहावरून ' हिटलर के साथी, जनाजो के बाराती,पुछते नही इनसा को पुछते धर्म और जाती हे गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित राजे जो जी जी हा पोवाडा सादर केला. परंतु समाजासाठी काय.ओ एक्टिंग करते भाई, हम फॅटिंग करते भाई. या शाहिरीसह ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाज बदलणारे होते. हे अनेकांना माहित नाही. ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. बाबासाहेबांनी शेतीवर लिखाण केले. येणारा काळ वाईट आहे. विचार मारले जातील. युद्ध विरोधी भूमिका बुद्धांनी घेतली. काही वेळात देशात धर्म उभे केले जाते. पायाभूत काम आपण केले पाहिजे. असा शाहीर भगत यांनी शहरी जलाशातुन प्रबोधनाचा जागर मांडला. जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असाच ठरला. भीमोत्सवात महिन्यापासून कार्यक्रमांमध्ये आपले वेगळे वैशिष्ट्य टाकण्यात येऊन वैचारिक परिवर्तन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.[ads id="ads2"]
भीमोत्सव आयोजन समिती आणि मनमाड शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 एप्रिल रोजी मनमाड शहरातून जे चित्ररथ निघाले त्यातून शिस्तबद्ध निर्व्यसनी वेळेचे बंधन पाळणाऱ्या पाच चित्ररथांची निवड करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक ट्रेनिंग कॉलेज जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रभाकर अहिरे, द्वितीय क्रमांक गौतम नगर जयंती उत्सव समिती अध्यक्ष अक्षय अहिरे, तृतीय क्रमांक भारत नगर जयंती उत्सव समिती दिनेश संसारे, उत्तेजनार्थ क्रमांक रमाबाई नगर जयंती उत्सव समिती अध्यक्ष अक्षय गरुड, श्रावस्ती नगर जयंती उत्सव समिती अध्यक्ष विजय भालेराव यांना पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे आदींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले.
भीम उत्सव आयोजन समितीचे आयोजक राजेंद्र पगारे, दिनकर दिवार, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, डॉक्टर जालिंदर इंगळे, निलेश वाघ, सतीश केदारे, मयूर बोरसे, राजेंद्र जाधव, संदीप नरोडे, पापा थॉम्स रामदास पगारे, मनोज ठोंबरे, भीमा महिरे, शेखर अहिरे, भास्कर कदम, अशोक परदेशी, बळवंत आव्हाड, पिंटू कटारे, दादाभाऊ शार्दुल, सचिन मुंडे, संतोष भोसले, फिरोज शेख, कादिर शेख, विकी सुरवसे, शाहीर शरद शेजवळ, विनोद अहिरे, प्रभाकर बागुल, सुरेश अहिरे, प्रकाश पठाडे, नरेन संसारे, राकेश कोल्हे, महेंद्र गरुड आदी यावेळी उपस्थित होते.



