कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा सुरळीत करा यामागणीसाठी भुसावळात वंचित बहुजन आघाडीचा हंडा मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



घोषणाबाजीने भुसावळ परिसर दणाणले 

 दीपनगर ता भुसावळ(सुमित निकम)  वंचित बहुजन आघाडी, प्रभाग क्रमांक १८ मधिल नागरीकांच्या माध्यमातुन आपले लक्ष वेधण्यासाठी पंचशिल नगर, प्रभाग क्रमांक १८ या विभागात  नगरपालिके कडुन  होणारा पाणी पुरवठा हा अनियमीत व कमी दाबामध्ये होत असल्याने   नागरीकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रभाग क्र१८ मध्ये मागासवर्गीय,अल्पसंख्याक,हातमजुर कष्टकरी नागरीक राहतात ,घरगुती व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात.नुकतीच डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती पार पडली जयंती मध्ये पण पंचशिल नगरवासियांना पाणी मिळाले नाही पंचशिल नगर हे भुसावळ शहराच्या मध्यवर्ती असतांना ही व भुसावळ नगरपालिका अ दर्जाची असतांना प्रभाग क्रमांक १८ मध्ये १०ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. [ads id="ads1"] 

  पंचशिल नगर प्रभाग क्रमांक १८ मध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसून अशुद्ध पाणीपुरवठा होत  असून पाणी येण्याची वेळ निश्चित नाही रात्री अपरात्री पाणी येते त्यामुळे नागरिकांना खुप त्रास  सहन करावा लागत आहे रमजान महिना तसेच सण उत्सवात पाणी कपात रद्द करुन नियमित व उच्च दाबाने  पाणीपुरवठा करावा या मागणी साठी  दिनांक १९/४/२०२३ रोजी सकाळी १०:००वा. वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वा मध्ये हंडा मोर्चा काढण्यात आला.[ads id="ads2"] 

  मात्र मोर्चाची सुरुवात पंचशील नगर येथून झाली व रस्त्यामध्ये नगरपालिका प्रशासन येऊन मोर्चा थांबून निवेदन स्वीकारले यावे विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे जिल्हा महासचिव वंदना अ सोनवणे महिला आ जिल्हाध्यक्षा राजु डोझगरदिवे गणेश जाधवभुसावळ शहराध्यक्ष

देवदत्त मकासरे मेजर शहर महासचिव बालाजी पठाडे दिलिप भालेराव बेबिताई बागुल लक्ष्मिबाई सोनवणे निवर्ताबाई साळुंके स्वप्निल सोनवणे बंटि सोनकांबळे अतुल पाटिल

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!